” ताई मी कलेक्टर होवानू! ” या शब्दात जेवढ गांभीर्य आहे तेवढाच दुःखाचा सागर तरुन आल्याची भावना देखील आहे. स्पर्धा परीक्षा हे बिरुद खूप फसव आहे हा ज्याचा त्याला आलेला अनुभव आहे, जीवनाचा परित्याग आणि यशाची आशा या मधील एक लांब पल्ल्याचा प्रवास देखिल आहे. त्यात एक यश आणि दुसरं अपयश कारण हजारोच्या संख्येने धावणाऱ्याच्या शर्यतीत केवळ पहिल्यांचाच विचार होतो इथं; 8-10 वर्ष अभ्यास करून शेवटी हाती काहीच न घेता परतत असताना त्या विद्यार्थ्यांची अवस्था एका शरीरावर बलात्कार झाल्या सारखी असते ते कोणालाच कळणार नाही, माग अशा निराश मानपुढे पर्याय उरतो तरी कोणता? हे कटू सत्य आहे मात्र या सत्याला ही पाणी पाजण्याची लढवंयी भूमिका आपली असली पाहिजे.अरे आपलं दुःख काय आपण सगळ्यांना सांगत बसतो का जे काही असेल ते आपलं आपल्यालाच माहिती असतं आणि जरी कुणाला सांगितलं तरी त्याचा उपयोग तरी काय होतो कोणी केलीच तरी तात्पुरती मदत एवढंच काय ते; का कोणी आयुष्याला पुरतं? लोकं याकून घेतात आणि फार तर सहानुभूती व्यक्त करतात पण परत आपलं आपल्यालाच पाहावं लागतं ना! या जगात आपल्या रथचा सारथी ही आपणच आणि प्रवासी ही आपणच असतो. जग केवळ बघ्याच्या भूमिकेत असतं. कोणी आला काय आणि गेला काय काही फरक नाही, काही काळ भावना व्यक्त केल्या की झालं, कुणाच्या मारणाने हे जग थांबत ही नाही आणि येण्याने सुधरत ही नाही. मरणा नंतर 13 दिवस अगर फरफार तर वर्ष त्या नंतर प्रत्येक जण विसरतो उरतात त्या केवळ तारखा,जयंती आणि पुण्यतिथी! सगळा मोहमायेचा बाजार! नशिबाने आणि आपल्या आई वडिलांच्या पुण्याईने आपणास मानव जन्म मिळाला आहे त्याला असंच वाया नका घालवू अभ्यासू वृत्ती जगी करा सखोल, खोचक आणि तेवढीच खेळकर : कारण खेळकर प्रवृत्ती ने पाहिल्यासा त्रासात पण एक वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक विद्यार्थी कोणत्याना कोणत्या त्रासाला तोंड देतोच आहे. आर्थिक, कुठं सामाजिक, तर कधी मानसिक पण हा नुसता पाहिला तर त्रास आहे पुढे लागलीत ती त्या त्रासाची भूषणे आहेत. सर्वात वाईट आणि स्वतःला कमजोर करणारी गोष्ट म्हणजे भांडवल करणं कारण ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गोष्टीच भांडवल केलं अगर झालात तर समजून जा की तुम्ही एका भयाण चक्रव्हिव्हात अडकलात. निर्णय घेता येत नसेल तर थोडं थांबा सर्व गोष्टींवर लक्ष द्या,बरकावे अभ्यासा आणि महत्वाचं म्हणजे मन अगदी तथागत ठेवा कारण एका बाजूला कललेली होडी त्याच बाजूला पडते तेंव्हा तथागत म्हणजेच तटस्थ राहून विचार करा. मनामधली नकारात्मकता काढून टाका, त्यासाठी अनेक मार्ग आहेत. एकच लक्षात ठेवायचं आपल्या चेहऱ्यावरच हसू सगळ्या जगाला आणि स्वतःला जगण्याची एक उर्मी देतंय बस.” यश असो अगर अपयश या दोन शब्दांमध्ये केवळ ‘ अप ‘ वगळता दोन्ही बाजूना यश आहे.” मित्रांनो धीराने घ्या थोडं कोणतीही परीक्षा ही आपलं व्यक्तिमत्व घडवत असते, व्यसंगी, चवफेर वा अष्टपैलू म्हणालात तरी चुकीचं नाही. जरी हे सगळं करताना नाहीच मिळाली post तर या जगाला स्पष्ट माथ्याने सांगायचं ” अनुभव विकत घेतला म्हणजेच लतादीदींच गाणं म्हणायचं विकत घेतला शाम बाई मी ” पण ओठांवर एक गाणं ठेवायचं ” हम होंगे कमियाब… एक दिन….. एक दिन “
By: नि3
